नागपंचमी (श्रावण शुदध पंचमी)
आपल्या भारतात नाग-साप यांना देव मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते.
या सणामागची पौरणिक कथा अशी की यमुना नदीच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी, दुष्ट सर्प होता. श्रीकृष्णाने गोकुळातील लोकांचे या नागापासून रक्षण केले आणि तो दिवस म्हणजे श्रावण शुदध पंचमी म्हणजेच नागपंचमी.
तेव्हापासून लोक नागाची पूजा करुन नागाला लाह्या, दूध वहातात. नागदेवतेने प्रसन्न व्हावे व आपल्याला त्रास देऊ नये ही यामागची धारणा असते. नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची सुद्धा पूजा नागपंचमीला केली जाते.
या दिवशी गारूडी लोक शहरात नाग घेऊन रस्त्याने हिंडतात व त्यांना घरी बोलावून लोक त्याची पूजा करतात. बत्तिसशिराळा येथे तर आजच्या दिवशी जत्रा भरत असते.
यावेळेस मात्र या नागपंचमीच्या सणावर पावसाचे सावट आहे. गेले दोन दिवस मंगळवेढा व परिसरात सततधार पाऊस पडत आहे