गणेशउत्सव

दरवर्षीप्रमाणे गौरीशंकर गणपती दहा दिवसासाठी विराजमान असतील। हा पाहुणा सर्वांच्या घरात वेगेवेगळ्या रूपात येतो. एखाद्या मूर्तीच्या हातात लाडू तर दुसरीने पगडी परिधान केलेली असते. काही मूर्ती उंदरावर बसलेल्या तर काही आरामात मांडी घालून बसलेल्या असतात. गणपती बाप्पाच्या येण्याने लहान-थोरांचा उत्साह द्विगुणित झालेला असतो. अनेक नावे धारण केलेल्या गणपतीची पूजा प्रत्येक शुभ कार्याच्या अगोदर केली जाते. हे असे आराध्य दैवत आहे की त्याच्याशिवाय कोणत्याचा कार्याचा प्रारंभ होऊ शकत नाही.

आजचे जग सौंदर्याच्या मागे धावणारे आहे। गणपती त्यात कुठेही बसणारा नाही. हत्तीचे तोंड घेऊन उंदरावर जाणारा तुंदीलतनू तरीही आपला वाटतो. त्यात एक नैसर्गिक सौंदर्य आहे. अशी ही मंगलमूर्ती विघ्नविनाशक आहे. त्याचे तोंड वाकडे असल्यामुळे तो वक्रतुंड आहे. पोट मोठे असल्यामुळे लंबोदर आहे. एक दात असल्यामुळे तो एकदंत आहे.

गणेशाचे येणे शुभ मानले जाते। या दिवसातील वातावरण उत्साहाचे असते. सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती केली जाते. सर्व देवता फूलांनी प्रसन्न होतात तेथे गजानन दुर्वा आणि केवड्याने प्रसन्न होतात. त्यांचे आवडते खाद्य म्हणजे मोदक आणि लाडू आहेत. चतुर्थीच्या दिवशी उपवास करणार्‍या भक्तांनी चंद्रदर्शन केल्याशिवाय उपवास सोडणे वर्ज्य मानले जाते.

खरोखरच अशा विलोभनीय विनायकाचे दहा दिवसानंतर विसर्जन होताना मन उदास होते. आजही गणपती काही कुटूंबात गणपती विसर्जनाच्या वेळी गणपतीबरोबर गुळ-तांदूळ आणि पैशांची शिदोरी देण्याची परंपरा आहे. कारण ते आपल्यापासून कितीही दिवस दूर राहीले तरी उपाशी राहू नयेत हा उद्देश असतो. 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या' या वचनाप्रमाणे ते पुन्हा एकदा आपल्यात वाजत गाजत आले आहेत. आपण त्यांची मनोभावाने पू्जा करा आणि त्याला अधिकाधिक समजून घेण्याचा प्रयत्न करा।