नागराज नवरात्र महोत्सव मंडळ

नागराज नवरात्र महोत्सव मंडळ, हे कारखाना रोड, नागणेवाडी मंगळ्वेढा येथे आहे। या वर्षी या मंडळाने लोककलेला प्रोत्साहन देण्यासाठी कळसुत्री बाहुल्याचा देखावा उभारला आहे. हा देखावा पाहण्यासाठी शहरातून व परिसरातून मोठी गर्दी होत आहे.
सामाजीक कार्य म्हणुन या मंडळाने महाराष्ट्राचा संस्कृतीक वारसा जतन केला आहे. दर वर्षी या मंडळा मार्फत समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले जातात.
त्याच बरोबर रांघोळी स्पर्धा, स्लो सायकल स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गीत गायन स्पर्धा अशा विवीध स्पर्धाचे आयोजन ही करण्यात येते. गेल्या अनेक वर्षा पासून हे मंडळ श्री क्षेत्र तुळजापूरहून पायी ज्योत आनत आहे।


चालू वर्षी या मंडळाचे अध्यक्ष श्री.सिध्देश्वर दशरथ जाधव (गुरुजी) हे आहेत.



कळसुत्री बाहुल्याचा देखावा