मंगळवेढा तालुक्यात व परिसरात शुक्रवारी (ता.2) रात्री झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी जुनी माळवादाची घरे जमिन दोस्त झाली आहेत. रात्रभर पडलेल्या मुसाळधार पवासामुळे परिसरातील ओढे,नाले दुथडी भरुन वाहत आहेत. ओढ्याला पुराचे स्वरुप आले आहे. मल्लेवाडी पुल पाण्याखाली गेल्याने पंढरपूर - मंगळवेढा मार्ग बंद झाला आहे. मंगळवेढा शहरत सुध्दा ठिकठीकनी पाणी सचाले होते. तसेच माणनदीला पुर आल्याने पुराचे पाणी गुंजेगावा मध्ये शिरले होते.
मल्लेवाडी पुल- (पंढरपूर - मंगळवेढा मार्ग)