लवकरच मंगळवेढ्यातील गणेशउत्सवाची खास झलक 'मंगळवेढा4यू.कॉम' च्या वाचकांसाठी...

'गणपती बाप्‍पा मोरया' च्‍या जयघोशात आज मंगळवेढ्यात गणरायाची यथासांग पूजाविधी करून स्‍थापना करण्‍यात आली. प्रत्येक घरांमध्‍ये घरगुती गणेशाची स्‍थापना करण्‍यात आली तसेच शहरातील विवीध मंडळांनी सवाद्य मिरवणूकीसह गजाननाची स्‍थापना केली.
सकाळपासून रस्‍त्‍यांवर गणेशाच्‍या मूर्ती नेणा-या कार्यकर्त्‍याच्‍या सवाद्य मिरवणूका दिसून येत होत्‍या। तर घराघरातून अबाल-वृध्दांनी गणेशाच्‍या मूर्ती आणि पूजेचे साहित्‍य खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. लोकमान्‍य टिळकांनी स्‍वातंत्र्य प्राप्‍तीच्‍या लढ्यात जाती-जातींमध्‍ये विभागल्‍या गेलेल्‍या समाजाला एकत्र आणण्‍यासाठी १८९४ मध्‍ये पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना मांडून हा उत्‍सव सुरू केला. तेव्‍हापासून राज्‍यासह देशभर गणेशोत्‍सव मोठ्या प्रमाणावर व पारंपरिक उत्‍साहात साजरा केला जात असतो. विशेषतः मुंबई व पुण्‍यात सार्वजनिक गणेशोत्‍सवाची धूम असते.